STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

4  

Savita Jadhav

Inspirational

नाळ जोडली मातीशी

नाळ जोडली मातीशी

1 min
268

सेवा करितो देशाची, नाळ जोडली मातीशी,

मोहपाश झुगारूनी, करी झुंज दुश्मनाशी//१//


वीर जवान देशाचा, प्राण अर्पितो देशाला,

अभिमान दाटे उरी, करू सलाम कार्याला//२//


सीमेवर जरी उभा, नाळ जोडली मातीशी,

घरदार नातीगोती, सदा आशिष पाठीशी//३//


नाळ भारत मातेशी, मनी जपली वीरांनी,

ऐकूनिया शौर्यगाथा, छाती फुलते गर्वानी//४//


असो किती दूर कुणी, नाळ जोडली मातीशी,

ऋण फेडण्या मातीचे, पुण्य बांधतो गाठीशी//५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational