STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

नागपंचमी

नागपंचमी

1 min
425

श्रावण शुद्ध पंचमीला

नागपूजा असे प्रचारात

करून कालियाचा पराभव

यमुना नदीच्या पात्रात ||


श्रावण महिन्यातील

असे पहिला हा सण

नागपंचमीला असे

सर्वात पहिला मान ||


सण असे माहेरवासिणीचा

बांधुनी झाडाला हिंदोळे

झोके घेते स्त्रिया, मुली

गाणी, उखाण्यांनी मन मोकळे ||


नाग, सापांची उपयुक्तता

सांभाळी हरितक्रांतीचे धुरा

धामण पाळा धान्य वाढवा

नागपंचमी साजरी करा ||


 जाऊ वारुळाला पुजायला

मानूनिया नागाला भाऊ

नैवेद्य कडी,दुधाचा दाखवू

वाहुनिया लाह्यांचा खाऊ ||


श्रावण मासा आला

सणांच्या उत्साहाचा

निसर्गाचे रक्षण करुनी 

वसा घेऊन जपण्याचा ||


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational