नाद खुळा
नाद खुळा
टपोरे डोळे, गालावर खळी,
ओठांवर लाली, दिसतेय खास
खरंच म्हणतात सगळे,
हिचा आहे नादच खुळा.
बांधा सडपातळ
जणू शेवग्याची शेंग
केस लांबसडक
जणू केरसुणीचा भांग
किती वर्णावे तिचे सौंदर्य
खरंच म्हणतात सगळे
हिचा आहे नादच खुळा
नेसला घागरा बहारदार
त्यावरी चोळी नक्षीदार
केसात गजरा सुवासिक
चेहरा दिसतो तजेलदार
किती वर्णावे तिचे सौंदर्य
खरंच म्हणतात सगळे
हिचा आहे नादच खुळा
आवाज तिचा दमदार
भल्याभल्यांना फुटतोय घाम
छेडछाड करता तिची
सोसावा लागतो तिच्या चप्पलांचा मार
खरंच म्हणतात सगळे
हिचा आहे नादच खुळा.
दिसायला आहे ती सौंदर्यवती
पण नाही ती आता नाजुक कळी
जो जो जाईल तिच्या वाट्याला
त्याला करेल ती धारातीर्थी
होऊनी खरी रणरागिणी
खरंच म्हणतात सगळे
हीचा आहे नादच खुळा.

