ना कळले...
ना कळले...
धूर्त वेळेचे गणित ना कळले ,
मोजले श्वासांवरी ना कळले...
फुलपाखरां सारखी रंग सांडले,
बोटावरी हलकेच ना कळले...
मिटलेल्या पापण्यांना दाटूनी आले,
हुंदका ओठावरीच ना कळले...
मी तीला कायमचे गमावले,
पायवाट जीवनाची ना कळले...
मृदूशय्याही आता बोचते रात्री,
कुस प्रेमाची पलटली ना कळले...
मातीत पुरल्या जाता आठवणी,
आठवणी मनात उरल्या ना कळले...

