न बाेलता कधीतरी
न बाेलता कधीतरी
न बोलता कधीतरी,माैन बाळगणं हितकारक,
कुठे नी काय बाेलायचे,याचं भान अत्त्यावश्यक
माैनामुळे आपल्या मनाला,प्राप्त हाेते अंतर्मुखता,
मनाच्या तटस्थतेमुळे,मिळते मनाला अलिप्तता
कमी बाेलून व्यक्तीमत्व,विचारशीलता करतं सिद्ध,
चुकीच्या बाेलण्याचा धाेका,कृती करून हाेताे प्रसिद्ध
पैशाची काटकसर करून,ठरत असताे धनवान,
शब्दांची काटकसर करून ठराल तुम्ही ज्ञानवान
