STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance Classics

4  

Ganesh G Shivlad

Romance Classics

मग येईन मी, सखे..!

मग येईन मी, सखे..!

1 min
321

सखे पूर आलाय आज, तुझ्या गावच्या नदीला..!

नाही तग धरणार नाव, माझी, लागेल वाहायला..!

थोडा वेळ लागेल, अजून पूर ओसरायला..!

आवरू दे जरा, त्या महापूराला..!

मग येईन मी, सखे.. तुझ्या भेटीला..!


कोरड्या आहेत विहिरी, अजून, तुझ्या अंगणातल्या..!

सखे... सुरुवात झालीये, आताशी, पाणी पाझरायला..!

थोडा वेळ लागेल, पाऊस भुईत झिरपायला..! 

भरु दे तुडुंब, त्या खोल विहिरीला..!

मग येईन मी, मनसोक्त त्यात डुंबायला..!


शुष्क आहेत अजून, त्या फळबागा, परसातल्या..!

आताशी लागल्यात, पालव्या कोवळ्या फुटायला..! 

थोडा वेळ लागेल, फळात दाणं भरायला..! 

बहरू दे लता, वेली, फळ, पाना, फुलाला..! 

मग येईन मी, गोड पाड चाखायला..!


बाहेर सर्द वारा लागलाय, मस्त सुटायला..!

गार वारा झोंबतोय, तुझ्या माझ्या तना मनाला..!

थोडा वेळ लागेल, रिमझिम पाऊस थांबायला..! 

थोडी पेटव शेकोटी, घरामागे अंगणाला..! 

मग येईन 'मी, तिथं' ऊब घ्यायला..!


सूर्य बघ आताशी उतरलाय पश्चिमेला..! 

नको पेटवू दिवे, जाऊ दे, त्याला मावळतीला..!

थोडा वेळ लागेल, आज तुझं घर उजळायला..!

कळ काढ थोडी, चंद्र उगवेल रातीला..! 

मग येईन मी, सखे तुझ्या सोबतीला..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance