STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics

4  

Sanjana Kamat

Classics

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत

1 min
215

नववर्षाचा पहिला सण उत्साहाचा,

सूर्याचा धनुतून मकर राशीत प्रवेश.

मकरसंक्रांत संस्कृती घडवी आदर्श,

ऋतूनुसार तिळगुळ खाण्याचा उद्देश.


उत्तरायणाची वाहे, गुलाबी हवा थंड, 

विसरे, थोरपणा, राखे सामाजिक भान.

सांगे, प्रेम, जिव्हाळा, एकजूटीचा मंत्र,

आनंदी जीवना झरस्त्रोत देदीप्यमान.


ऋतू बहरे प्रेमाचा मखमली शृंगारात,

भांडण, तंटा, किल्मिषे विसरून सारी.

पहिल्या डोहाळ्यात, हलव्याचे साज,

पारंपरिक साजात सुंदर दिसते नारी.


सण सोहाळे, संस्कृती देशाचे महामेरू,

नभांगणी उधळे गुलाल सप्तरंगात.

विश्व कल्याण्या मिळे सार द्विगुणित,

विहंगम दृश्य पतंग नक्षी आकाशात.


संसार, परमार्थाचा साधे संगम पवित्र,

सुहासिनीचा देवाण घेवाण थोर मान.

हर्षोल्लास, सद्भावनेतून दानाचे महत्व,

स्नेहवेल वाढे, निर्झर प्रेमाचे महिमान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics