आला श्रावण आला श्रावण
आला श्रावण आला श्रावण

1 min

80
धरित्रीची काहिली तापता, पर्जन्ये अवनी मोहरता
वसुंधरेला खुलविण्यासी, आला श्रावण, आला श्रावण
घननीळ तो आला बरसत, नद्या धबधबे तोषे गर्जत
कुंदवात तो दरवळण्यासी, आला श्रावण आला श्रावण
सोनसळी हिरवाई घेऊन, सृष्टी आली फुलुनी बहरुन
नवचैतन्य जागविण्यासी, आला श्रावण आला श्रावण
नवपरिणित ती मोदे न्हाहता,
तन-मन त्यांचे बहरुन येता
नवमीलन फुलविण्यासी, आला श्रावण आला श्रावण
ओलेती नव प्रतिभा खुलवित, साज तयाला मोदे घालत
काव्य बहरविण्यासी, आला श्रावण आला श्रावण