शंकर स्तुती
शंकर स्तुती
1 min
161
नीलरंगी शंकरा
सांब सदाशिव शंकरा
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानांची...
गला तुझ्या रूद्राक्ष माळा
लाविले भस्म तू कपाळा
त्रिशुल डमरू आहे हाती
शंकरा सोबत पार्वती...
जटेमध्ये झुळझुळू वाहे गंगा
मस्तकावर शोभे चांदोबा
भोलेनाथ आले तुझ्या दारी
चूक-भूल घाला हो तुमच्या पदरी...
करूणाकारा हो शिवशंकरा
समजून घ्यावे या पामरा
पाठी उभे राहूनी हो
भक्ता आपण सामर्थ्य द्या शंकरा...
देवांच्याही देवा आपण
शिवशंकर महादेवा
मनात जपून ठेवलाय
तुमच्या नामाचा ठेवा...
ॐ नमः शिवाय नमः...