Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Classics

4  

BABAJI HULE

Classics

# बायको ही बायकोच असते ---

# बायको ही बायकोच असते ---

1 min
629


बायको ही बायकोच असते,

कारण ती दोन कुटुंबामधील दुवा असते ---

दिवस रात्र राबून सर्वांचे प्रेम जपणारी,

तिखट तुरट शब्दांना साखरेचा गोडवा देणारी,

कोणत्याही संकटाना न डगमगणारी,

थंडी वाऱ्यात मखमली शालेत आसरा देणारी,


बायको ही बायकोच असते ---

समईतल्या ज्योतीसारखी अखंडपणे कुटुंबासाठी तेवणारी,

मेणबत्तीसारखी स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी,

स्वतःच्या कुटुंबासाठी वाढवते ती रोजच गोडवा,

अडचणींच्या वेळेतही साजरा करते ती नेहमीच पाडवा 


बायको ही बायकोच असते ---

स्वतःच्या अपेक्षांना मुरड घालणारी,

आयष्यातील प्रत्येक आठवणींचा ठेवा जपणारी,

घडलेल्या प्रत्येक जखमेवरची ती बनते खपली,

उन्हापावसात सर्वासाठी उभी राहून देते ती वटवृक्षाची सावली,


बायको ही बायकोच असते ---

कुटुंबाचा बगीचा नाजूक फुलांनी फुलविणारी,

फुललेल्या फुलाचा सुगंध घरभर पसरवणारी,

एका कुटुंबाचा त्याग करून दुसरे कुटुंब घडविणारी,

स्त्री जन्मा हि तुझी कहाणी बाईत आई होणारी,


बायको ही बायकोच असते ---

प्रत्येकाच्या ह्रदयाच्या संवेदना जपणारी,

एकमेकांच्या डोळ्यातील आसवे पुसणारी,

हाकेला आरोळी देणारी आणि वेळेला टाळी देणारी,

जनोजन्मीचे एकमेकांचे ऋण फेडणारी,

बायको ही बायकोच असते -----


Rate this content
Log in