STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

3  

Prashant Shinde

Tragedy

मूल्यमापन..!

मूल्यमापन..!

1 min
610


मूल्यमापन जीवनाचं करताना

जीव वरखाली होतो

स्पर्धेच्या या युगात

जीव कासावीस होतो....

कोणी म्हणे शिक्षण घ्या

कोणी म्हणे व्यवसाय करा

कोणी म्हणे काय उपयोग

कोणी म्हणे पाहतो योग...

शिक्षण म्हणे बाजार झाला

कोणी म्हणे शेजार भोवला

कोणी म्हणे काळ सोकावला

कोणी म्हणे जीवच कावला..

हाताबाहेर गेले सारे

हतबल झाली जीवनसरणी

म्हणे देवा ही रे कसली

तुझी विचित्र करणी...

पैसा झाला खोटा

पाऊस आला मोठा आता होत नाही

पैशा शिवाय शिक्षण म्हणे

चांगले कोठेच मिळत नाही...

पण खर सांगू

अजून इतका पैसा 

मोठा अजिबात झाला नाही

शिक्षणाचे पारडे जड तो काही

आजपावेतो उचलू शकला नाही...

ज्ञानाचे तुळशी पान

जोवर डोक्यात आपण ठेवत नाही

तोवर काही वजन 

शिक्षणाचे आपल्याला कळत नाही..

एकच ज्ञान कण पुरेसा आहे

जीवन हलके करायला

जीवनाच्या अवघड परिस्थितीतून

स्वतःला लीलया सावरायला....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy