STORYMIRROR

Aruna Honagekar

Comedy

3  

Aruna Honagekar

Comedy

मुंबई मेरी जान

मुंबई मेरी जान

1 min
125

लोकलच्या गर्दीत हरवली होती ती

प्रथमच मुंबई ला पाहत होती ती।

मुंबई चे नाव ऐकले होते तिने

सर्व धर्मी राहतात इथे गुण्यागोविंदाने।

आजूबाजूला ओघ गप्पांचा

कानातले, गळ्यातले विकणा-यांचा।

होती पंजाबी ती, पण घाबरलेली

कोणाला विचारू हया विचारात गढलेली।

सांगितले उतरायला नव-याने

तिला व्ही. टि. स्टेशनला

विचारले धीराने कुठे उतरावे एकीला।

सगळ्यांबरोबर उतरली ऐटीत

व्ही. टि. स्टेशनला।

सी. एस. टी. ची पाटी पाहून

आले तिला रडायला।

दिसता समोरून येताना पती

क्षणभर झाली मूढमती।

दिले अलिंगन पतीला

सांगता कहाणी घडलेली

आले हसू पतीला।

वदे पती तिला

मुंबई नगरी असे मोहमाया

इथे जो आला

वो वापस कभी नहीं गया।

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy