मुलगा की मुलगी
मुलगा की मुलगी
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी
या वादात मला पडायचं नाही
आई बाप होण्याच सुख या
अंधश्रद्धेपायी झुगारायच नाही
दिवा असो वा पणती
जळणे नशीबी आहे
चटके बसल्याशिवाय का
अंगी देवपण आहे
मुलगा जगण्याचा स्त्रोत
अन मुलगी जगण्याची उर्जा
कशाला मग हे हवेदावे
नका बिघडवू तुमचा दर्जा
बहिणीस हवा भाऊ जसा
पतीस हवी पत्नी तशी
मैत्रीत नसावे नाते कुठले
जगण्याची हवी ओळख अशी
नका करू भेद असले
जोडली आहे नाळ तुमची
पिल्लाला दाखवावे जग
जबाबदारी आहे तुमची
