मुकुट तिरंगी
मुकुट तिरंगी
हिंदमातेचे रक्षण करण्या
चंदनापरी झिजतो जवान,
चित्तथरारक ज्याचे कृत्य
हिमालयागत उंच कमान ॥१॥
प्राणांहूनही प्रिय ही भूमी
कर्तव्यापरी निष्ठेचे दान,
वार झेलूनी छातीवरती
सज्ज देण्या तो बलिदान ॥२॥
भस्म फासतो देशभक्तीचे
फोडूनिया व्याघ्र डरकाळी,
विजयश्री खेचता रणांगणी
मुकुट तिरंगी चढवी भाळी ॥३॥
सैनिक पत्नी होणे कठीण
आई ढाळते अश्रू कित्येक,
धन्यत्व मानी त्यातच सारे
होतो अजरामर पती-लेक ॥४॥
