STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

मुखवटे नात्यांमधील...

मुखवटे नात्यांमधील...

1 min
307

मतलब आणि स्वार्थाने घेतली जागा मनात

पाहिले मी दऱ्या निर्माण झाल्या नात्यात 

घालून मुुुुुुुुखवटे येथे फिरत आहे प्रत्येक नातं

ओळखू येत नाही हे आहेत परके की आप्त

गळ्यात गळे घालून गोड बोल बोलून

घेऊन मिठीत घालतात विश्वासघाताचा सुरा पाठीत  

असतात रक्ताचे पण तरीही वागतात दिखाव्याचे.

म्हणतात सारे संकटात आपलेच धावून येतात.

पण अनुभवलं मी दुःखात लोटून दुरून मदत देण्याचा

आव सारे आणतात म्हणून तर इथे शेतांवर

बांध घातले जातात घराघरांत वाटणीच्या रेेेषा पडतात

मुखवटे नात्यांमधील अनुभवले मी आहेत

बेगडी या नात्यांना ओळखले मी आहे

मागचा अनुभव पुढचे शहाणपण जाणून मी आहे

पण तरीही नाते कधीतरी आपले म्हणून

वागतील ही आस ठेवून मी आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational