मुखवटा
मुखवटा


मुखवट्यांवर भाळणाऱ्या माणसाला
बहुरूपी सोंगाड्या बरा वाटतो....
रंगभूमीवर सांडलेल्या खोट्या रक्ताचा रणसंग्राम
त्यांना इतिहासाहून जास्त खरा वाटतो....
भिंतीवर लटकलेल्या प्रतिमेतला देवही मग
पहाटेच्या स्वप्नांचा किमयागार वाटतो....
धूळफेकीच्या द्वंद्वातला तरबेज खेळाडू
त्यांना गावकुसातला सर्वात इमानदार वाटतो....
पुस्तकांनी सजवलेल्या अलमारीला
बंदिस्त पानांचा गंधही हवा वाटतो....
ठेक्यावर धरलेल्या निष्क्रीय कवितेला
कोपऱ्यात बसवलेला गूढ कवी नवा वाटतो....