मृत्यू
मृत्यू
क्षणभंगुर जीवनाचे गुढ उमजेल का कधी कुणास?
क्षितीजाच्या आड मावळणारा सूर्य हेच सांगतो
विचारांचे तेज संपले की सुरू होतो परतीचा प्रवास
जन्माला येण्याचा आहे
निश्चित कालावधी,
मृत्यू मात्र येतो अवचित न देता अवधी!
आपल्या आयुष्य नावाच्या
जीवन वाटेवर भेटणारा
असतो हा शेवटचा पाहुणा
तोच आपल्या नश्वर शरीरातील श्वासाची
अविरत चालणारी थांबवतो विवंचना
क्षणात फिरतो दुःखाचा नांगर,
जिवलगाची सुटते साथ
अनावर अश्रूंचा आकांत
कमावले सारे विलीन
होतात शून्यात
आपलेच माणस दूर करून जातात स्मशानात
नियतीपुढे कोणाचे
काही चालत नाही
मग कसला अंहकार
धन, वैभवाचा
सगळी स्वप्न, इच्छा अतृप्त ठेवून आपल्या कवेत घेतो मृत्यू अटळ आहे तो काही टळत नाही
म्हणूनच सरतांना ओळी
आयुष्याच्या त्याला तू वाचून घे
आयुष्याला एकदा जरा
डोळे भरून बघून घे
अबोल प्रेत होशील
नंतर आताच जे काय ते बोलून घे
भरभरून जगण्याला
प्राधान्य दे आधी
अमूल्य मानवी जीवनाची पुन्हा नाही रे संधी
आता तरी समजून घे
