STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

मरतो कोणी

मरतो कोणी

1 min
14.4K


वस्तीमध्ये दंगेधोपे करतो कोणी।

भूकेपायी खाण्यासाठी मरतो कोणी।।


धर्माचेही झेंडे झाले न्यारे न्यारे।

स्वार्थासाठी हाती त्यांना धरतो कोणी।।


मागे असतो सारे काही करतांना जो।

आदर्शाचा बुरखाही पांघरतो कोणी।।


झाडे लावा झाडे लावा नुसता घोषा।

'वृक्षारोपण' नावाखाली चरतो कोणी।।


घोडे बाजाराची संधी येते जेव्हा।

हाती येते तैशी झोळी भरतो कोणी।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy