मरण असेल असे
मरण असेल असे
...हाडामासाचा सांगाडा,
त्याचे इतके सारे चोचले होते
पण मरणाच्या विळख्यात
आजवर कोण वाचले होते...
...शेवटी यमाने आत्म्याला
माझ्या वर खेचले होते,
नातेवाईकांनी माझ्या मग
माझे सरण रचले होते...
...मृत्यूने गुलाब केले मला पण
जगताना फक्त काटेच टोचले होते
रडत होती बरे, आज ती लोक जी
जन्मानी माझ्या आनंदाने नाचले होती...
...शेवटी चित्रगुप्ताला या माणसाबद्दल आपल्या
पुस्तकात नव्हते काही शल्य याचे बोचले होते
कळले त्याला की या येड्याला अर्ध्यापेक्षा
अधिक काळ फक्त काव्यच सुचले होते...
