मराठी मायबोली
मराठी मायबोली
मराठी आमची मायबोली
भाषेत आमच्या नम्रता
जाती धर्माचे भेद ना ईथे
भाऊ बंधु आणि समता......
मराठी बोलणारे आम्ही
भाषा आमची मायाळू
घाम गाळून काम करणारे
लोक आम्ही कष्टाळू..........
आदराने बोलणारे आम्ही
मराठी आमच्या रक्तात
मान सन्मानाची भाषा आमची
प्रेम,जिव्हाळा आमच्या मनात.......
मराठी बोलताना फुगते
गर्वाने आमची छाती
प्रेमळ भाषेमुळे टिकून राहते
आमच्या मराठी लोकांची नाती..........
आमची माती आमची माणसं
भाषेचा अभिमान कणाकणात
माय मानून घाम गाळतो
दिवस रात्र मराठी लोकं रानात........
अशी -हदयातून जपणारी
मराठी आमची मायबोली
एकमेकांच्या सुख दुःखात
डोळे होतात आमची ओली.......