मराठी भाषा
मराठी भाषा
महाराष्ट्र मातीत मराठी जन्मली
मराठी मनाच्या अंगी भिनली
अशी आमची भाषा रसाळ बोली
मराठी माणसाच्या ह्रदयात वसली
संत सज्जनात वाढू लागली
निसर्गाच्या सोबतीने खेळू लागली
शाळा, काॅलेजात घुमू लागली
जनजनासाठी मराठी कष्टली
एक एक अक्षराने समृद्ध झाली
शब्दा शब्दाने शिकवूू लागली
सार्या विश्वात शोभून दिसली
संस्कार जगास देण्यात पुढे आली
आदर्श पिढ्या घडवू लागली
राज्यभाषा म्हणून ओळख पटली
युुगे युगे भाषा अमर झाली
जतन साधु संतानी आजवर केली
प्रेम, बंधुभाव घेवून विश्वात नांदली
मराठी मनाच्या रक्तात भिनल
मराठी भाषेचे गौरव कौतुके झाली
महाराष्ट्राच्या चारही दिशात गर्जु लागली
तिच्यासाठी संघर्ष तीव्र झाले
मराठी वीर धारातिर्थी पडले
त्यांच्या रक्ताताने इतिहास घडला
मराठी बाणा जीवंत ठेवला
