मोर चोर
मोर चोर
*मोर*
माझ्या बहरलेल्या रानात,
थुईथुई नाचतो मोर.
बघून त्याच खुलत रूप,
जीवाला लागलाय घोर.
सौंदर्य बघून त्याचे,
नेईल चोरून एखादा चोर.
नृत्य करताना बघून त्यास,
लाजते बहरलेली बोर.
रंगबिरंगी पिसारा पाहण्या येते,
चंद्राची कोर.
एकएक पिस लुटाया,
जमतात सारी द्वाडपोर.
सौंदर्य.....
निळ्या रंगाच्या मानेला,
खुणावतो झोक्याचा दोर.
डौलदार शरीर बघुन,
वय विसरायला लावी चितचोर.
पिसाऱ्यावरच्या चंद्रठिपक्यांना,
भाळते रानातले ढोर.
सौंदर्य...
