खारूताई
खारूताई
आली आली,
खारूताई अंगणी.
हसऱ्या गालात,
तिच्या खुले चांदणी.
दुडुदुडू दुडूदुडू,
अंगणात धावते
रांगोळी माझी,
रोजच पुसते.
लपाछपी माझ्याशी,
झाडावरून करते.
क्षणात इथे ,क्षणात तेथे,
वेड मला लावते.
सोनेरे केस,
टपोरे डोळे.
निरागस मन,
दिसते भोळे.
झुबकेदार शेपुट,
आनंदात हले.
तिच्या खेळण्याने,
चांदणे सांडे.
