अक्षर चु चू
अक्षर चु चू
1 min
724
चुलत भावाची चुटकी,
आहे खुप हुशार.
चुणचुणीत बोलण्याने,
बक्षिस पटकावते फार.
हिरवा चुडा चुडीदार सलवार,
आवडतो तिला.
चुकाची भाजी चुरमाचे लाडू,
द्या म्हणते मला.
चुरमाच्या लाडूवर,
तर चुटकीसरशी मारते ताव.
चुकलाच नियम तर,
रडून जमा करते गाव.
चुरगळलेल्या कागदांची,
पेटवते चूल.
सर्वांना सांगते,
शाळेत पाठवा प्रत्येक मूल.
शिकल पोर तर,
होईल लय मोठ.
चुना लावणार नाही कोणी,
जग थोपटेल पाठ.
नको चुराडा ताई,
नाचू वाचू आनंदात.
नको चुगलखोरी आता,
जाऊ विद्येच्या दारात.
