मामाचे गाव
मामाचे गाव
1 min
561
*मामाचे गाव*
मामाचे गाव .
टुमदार छान.
गावाच्या बाजुला,
ओसाड रान.
मामी म्हणाली,
हवा का दाम.
चला सारे,
करूया काम.
ओसाड रान,
सारे खोदले.
मऊमऊ तिथल्या,
मातीला केले.
लावल्या रानावर,
आंब्याच्या राई.
तसेच फुले,
सुंदर जाईजुई.
एकेकाने केली,
त्यांची राखण.
ओसाड माळावर,
फुलले नंदनवन.
मामीने आमच्या,
करामत केली.
वांझोटी कुस,
लेकरांनी फुलली.
मामाचा गाव,
हिरवागार झाला.
संशोधन करायला,
शास्त्रज्ञ आला.
गावाचे त्यांनी ,
कौतूक केले.
पुरस्कार गावाला,
मिळवून दिले.
