दादा
दादा
*दादा*
दादा माझा,
राजबिंडा छान.
जणू दिसतो,
केवड्याच पान.
सर्वाचा घरात,
तो लाडका.
वाडा करतो,
आमचा बोलका.
हसरा दादा,
लयभारी दिसतो.
मला तर त
याचा हेवाच वाटतो.
शांत दादा,
कधीकधी चिडतो.
जाऊन आजीच्या,
कुशीत झोपतो.
मी आहे त्याची,
लाडाची ठमी.
मला कशाची नाही,
पडु देत कमी.
दादा सर्वाचा,
जीव की प्राण.
डोळ्यात त्याच्या,
प्रेमाचे बाण.
नटखट दादा ,
घरभर हिंडतो.
गोकुळातील कृष्ण,
जणू तो भासतो.
*दादा*
दादा तुझ्यासवे,
माझे नाते जुळे.
तुझ्या प्रेमाचे,
छत्र मला मिळे.
एकाच कुशीत,
जन्म आपुला रे.
तू शांत शांत,
मी नटखट का बरे.
माझे लाड पुरवताना,
खातोस तू मार.
कडेवर फिरवत मला,
उचलतोस भार.
माझ्यासाठी आणतोस,
चिंचा कैऱ्या बोर.
बाबांच्या खातोस ,
चापटा चार.
माझासुद्धा वाटणीचा,
मार तू खातोस.
लाडे लाडे पापे घेत,
गोड गाणे गातोस.
