मोडू कसा
मोडू कसा
बंधनांना जुन्या आज मोडू कसा
कोंडल्या भावना , मौन सोडू कसा
रोज स्वप्नं नवी पाहतो सारखी
रंगलो त्यात जर, त्यांस तोडू कसा
दूर झाली अता माणसे आपली
माणसांना पुन्हा, सांग जोडू कसा
हस्तरेषा कशी काढली वेगळी
टाळताना तिचा, दोष खोडू कसा
भावना दाटल्या पाहतो मी उरी
राहण्या मोकळे, बांध फोडू कसा
