STORYMIRROR

SANJAY SALVI

Tragedy

3  

SANJAY SALVI

Tragedy

मंत्र

मंत्र

1 min
12K


ओसाड रान माळावरती,

गुरे मातीसी हुंगत फिरती,

कुठे नसे गवताची काडी,

असे उभी ती बाभूळ वेडी,


डोंगर उघडे बोडके,

भूईलाही गेले तडे,

तळे झाले कोरडे मोकळे,

नदी नालेही तहानलेले,


बाया बापुडे वन वन फिरती,

घेऊन घागर डोइवरती,

ओंजळीभर पाण्यासाठी,

तहानलेल्या तान्हयासाठी,


पाणवठा ओसाड पडला,

चावडीवर गाव जमला,

कोणी म्हणे देव कोपला,

कोणी म्हणे कली जागला,


एक विचारी उभा राहिला,

कथा दुष्काळी सांगू लागला,

झाडे लावा झाडे जगवा,

मंत्र मनी तो धारा म्हणाला,


झाडे लावा झाडे जगवा,

मंत्र मनी तो धारा म्हणाला,



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy