STORYMIRROR

Nagesh Dhadve

Inspirational

2  

Nagesh Dhadve

Inspirational

मनी पारंबी फुटली

मनी पारंबी फुटली

1 min
2.7K


डोळ्यातले स्वप्न
भरत नसून हाताने
धर्म जाती जगभर विकून
पैसा मिळती घाताने
लग्न गाठी जोडुनी
नातीगोती ही मळली
आयुष्य झेलता झेलता,
मनी पारंबी फुटली

गरीबांची परिस्थिती 
पाहूनिया अंत
झडता झडता आयुष्याची
होऊनिया खंत
आयुष्याच्या दुःखामध्ये 
गरिबी झडली
आयुष्य झेलता झेलता,                  
मनी पारंबी फुटली

हाल कसे जगायचे,
कोण कधी मरायचे,
डोळ्यातल्या अश्रूची
मनातल्या आशेची,
परिक्षा घेऊन
धागेदोरे ही तुटती
आयुष्य झेलता झेलता,
मनी पारंबी फुटली

दुःख नको आता दारी
आता करावा संसार
तूटतील नाती
मनी येईल हंकार
जगापुढे दिसुनी
हार पण जिंकली
आयुष्य झेलता झेलता,
मनी पारंबी फुटली

-नागेश(ndd)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational