मनी आले ....
मनी आले ....
मनी आले आज पक्ष्यांसारखी आकाशात उंच झेप घ्यायची...
उडत उडत जमिनीशी येऊन गळा भेट करायची...
हवेत पंख पसरून हवे तिथे हिंडायचे...
ना बस टॅक्सी किंवा रिक्षासाठी थांबायचे...
समुद्राच्या वरुन उंच भरारी घ्यायची...
ड्रोनसारखं वरुन निसर्गाची छायाचित्रे डोळ्यात टिपायची...
विमानाला उडताना जवळून पाहायचे...
ट्रॅफिकपासून एक दिवस स्वत:ला सोडवायचे...
लांबलचक ट्रॅफीकच्या रांगा वरून पाहायचे...
भुर्रकन झेप घेऊन पुढे निघून जायचे...
मनी आले माझ्या असं काही तरी आज खास करायचे...
