Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

मनातील गझल...!

मनातील गझल...!

1 min
7.2K


दोन चार ओळी लिहीताना

कोपराही बोळ्यांनी भरुन गेला

शाई झरताना लेखणीतूनी

हातही निळाच राहून गेला


कागदांवर राज्य माझे

मलाच सीमा कळली नाही

साम्राज्य लयास जाता

कवितेने डोके वर काढले


कंठ लेखणीचा टांगतीस लागता

शब्द ही रुसून बसले

काव्यात गझल शोधता

काव्यच निघून गेले


त्या कातर वेळी पहिली लिखावट

माघारी फिरून आली

हसू गाली उमटले जेंव्हा

त्या कवितेचीच गझल झाली....!!


Rate this content
Log in