मनात साठतंय
मनात साठतंय
सारे जातील सोडून, सोबत नसते कोणाची.
आपल्यांची साथ असते सोबत, गरज नसते सणांची.
निघून जाते ती वेळ, लक्ष्यात राहतात त्या आठवणी.
मध्येच थांबली काही नाती, नशीबी दुखःला पाठवणी.
कसला सूड अनं कसला राग, आता सारं विसरलोय.
आपली कामे आपल्या हाती, कर्मा सोबत पसरतोय.
व्हायचं ते झालं, आता मार्ग नवा शोधूया.
गाफील दुःखावर मात, नव्या आनंदाने साधूया.
सारं काही येते जाते, अगदी सुखं दुखः सुध्दा.
आपल्या जागी ठाम जगणं, आयुष्याचा एकच मुद्दा.
आधी ही आला आता ही येतोय, कठीण काळ कसोटीचा.
सक्षम पाय रोऊनी सामना करतोय, जीद्दीच्या सचोटीचा.
नाही नाराज कोणावर, बस थोडं शांत वाटतंय.
आसू आणी हसू तेवढेच आहे, फक्त सारं मनात साठतंय.
