मनात खरच आहे का तिरंगा
मनात खरच आहे का तिरंगा
घरा घरात फडकला तिरंगा
खरच स्थान आहे का मनात
राहून राहून येतो विचार
काय उत्तर द्यावे क्षणात
प्रश्न पडणेआहे स्वाभाविक
आपणच आहोत जवाबदार,,
आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्याची
किंमत कशी कळणार
फिरवा नजर इतिहासात
नव्या पीढीला करा जागृत
समजवा यातना पारतंत्र्याच्या
समजता होतील स्वीकृत
वाचा पाढे हुतात्म्यांचे
तिरंग्यासाठी दिधले प्राण
जाणा अभिमान तयांचा
व्यर्थ न जावो त्यांचे बलिदान
जाणता महती तिरंग्याची
नको नुसते वैचारिक महत्व
मनातून करा त्याचे पठण
कृतीत दिसेल त्याचे प्रभुत्व
देशप्रेम देशभक्तीची
द्यावी सदैव शिकवण
विश्वात शोभावा भारत
याची ठेवा आठवण
