STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

मनाच्या कुपीतील गोड आठवणी

मनाच्या कुपीतील गोड आठवणी

1 min
202

अत्तराच्या कुपीत जसा बंद असतो सुगंध,

मनाच्या कुपीत तसा आठवणींचा गंध


आजीच्या संदुकीत भुतकाळाच्या साठवणी,

तशाच मनाच्या कुपीत बंद गोड आठवणी


काळ्याकुट्ट आकाशाची शोभा वाढवते लुकलुकणारी चांदणी,

मनाच्या कुपीत टिमटिमत्या तशा गोड आठवणी


कधी असतात आपल्या तर कधी दुसऱ्यांच्या

व्यक्त होण्यासाठी हवी समजणारी व्यक्ती

तरच मोकळ्या होतात या मनाच्या कुपीतील गोड आठवणी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational