मनाची खोल दारे
मनाची खोल दारे
मनाची खोल दारे
होवू दे प्रफुल्लित सारे
साद घाल पाखरांना
शिळ घालत येई वारे
फुलांना बहरू दे अगंणी
डोलू दे मखमली ताटव्यात
बागडू दे फूलपाखरे सारी
रानाच्या हिरव्या बटव्यात
वसंत नाचत येईल दारी
आकाश निरभ्र नितळ निळे
सडा फुलांचा झाडाखाली
शातं एकटे तिथे तळे
पाण्यावरती उडती तरंग
उधळे आकाश त्यात रंग
थंडगार ती बोचरी हवा
शांत मनाची एकच दवा