STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

मन..!

मन..!

1 min
290


मन...!!


मन मिळाले आंदण

त्याला प्रेमाचे कोंदण

सजले देहाचे आंगण

भरले सत्कर्माचे रांजण


धूप दीप प्रज्वलित

चैतन्य नांदे अंतरात

माया प्रेम उदरात

पसरे सहजी जनात


मन मन हे ईश्वर

देह असला जरी नश्वर

प्रमाण नांदे हृदयात

ज्याचा सुगंध आसमंतात


झाकुनी झाकेना

असा चमत्कार घडला

दिवस भाग्याचा

आज नवा उजाडला


मन बेभान होता

उतू प्रेमास आले

मनाची जाण मनास होता

ओळख झाली मनाची मनास


मन मनकवडे

मनात रमे मन

मनाची ओळख

होते जाणता मनास...!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational