STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Inspirational

मन

मन

1 min
428

पंचन्द्रिय शरीरात

वसतो सुंदर मन

चांगले विचार

मनाचे अमुल्य धन


मनाची चंचलता

निरागस बालक समान

विचारांच्या एकाग्रतेने

मनावर ठेवावी कमान


विचारांच्या शुद्धतेसाठी

सदा सुसंगती घडावी

मनाच्या चंचलतेला

चित्त एकाग्रतेने गाडावी


आपला हा मन

आहे अती बलवान

याच्या नियोजनाने

माणूस बनतो भगवान


आपले जीवन,स्वत:

घडवा आई बनून

मनाच्या तिजोरीतून

रत्ने काढा खणून


मनाच्या शक्तीने

आदी जाणा मी कोण

मी पणाला जानताच

हरपेल अहंभावाचे भान


गर्व विहीन देहाला

भेटेल खऱ्या सुखाची युक्ती

ज्ञानी लोकांच्या तोंडाने

सांगतो हीच खरी मुक्ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational