मन
मन
मन पाखरू पाखरू
त्याले कसं मी आवरु
सैरावैरा पळतो
माझ्या आत्म्याचा लेकरु
आक्षा आकांक्षाचा सार्थी
हा पराक्रमी वीरू
असा राहे चिकटून
जसा मासाले लागला नारु
सहस्र पंखाचे बळ
उडे चहूकडे भुरभुरु
चंचल सोम रस प्याऊन
चाल याची तुरु..रु..रु
सर्व इच्छांचा राजा
माझ्या आत्म्याचा वासरु
माया काळजाचा तुकडा
याले कसं मी विसरु
