STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

4  

Ashok Shivram Veer

Inspirational

मन

मन

1 min
375

मन किती वाईट असतं ना 

कोणाच्याही मागे मागे फिरतं,

नाही कधी कोणी त्याला भेटलं 

तर ते कसं एकटंच झुरत बसतं


कधी याच्या मागे तर कधी 

त्याच्या मागे धावत सुटतं,

कधी कधी तर एकटंच कसं 

कोपऱ्यात बसून राहतं


फिरून फिरून जेव्हा हे मन कसं 

उदास होऊनी जातं,

मग स्वतःलाच सावरून 

असं कोणाला तरी कवेत घेतं


कशी सदानकदा आस ही लागते 

फक्त त्याच जीवाची,

अन अशी धडधड वाढू लागते 

बघ याच वेड्या हृदयाची


आवरु कसं मी सावरू कसं मी 

माझी मलाच आज हे कळंना,

किती समजावलं या जीवाला तरी 

मन काही केल्या हे वळंना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational