मन माझे
मन माझे
स्पर्शुनी जाते मन माझे बिचारे
कासावीस होतो जीव हा माझा
जेव्हा नसतो काही ठावठिकाणा
आठवणीत विचार करते तुझा..!
का?असा वागतोस मज सांग ना
तुझ्याविना नाही करमत रे मला
आसरा फक्त तुझा आहे मनाला
का हे कळत नाही सांग ना तुला..!
का?घेतोस परीक्षा तू माझी सांग
माझ मन दु:खावे वाटते का तूला
श्वासात तुझ्या नावाचं आहे कोंदण
कळत का नाही सांग तुझ्या मनाला..!
तुझ्या या वागण्यामुळे कसं होईल
तुच मला आता सांग रे समजावून
काळजी वाटते खूप वेड्या मनाला
वाट तुझी पाहुनी जीव जाईल निघून..!
