मन माझे हरवले
मन माझे हरवले
आकाशी बहुसंख्य चकाकती या तारका
पण मनी का अंधार दाटला आहे कळे ना मला
शोधत मी बसले चारी दिशा नयनांनी
पण का कुणास ठाऊक मन माझं हरवलंय
बाहेर वादळ तुफान माजलंय मनात माझ्या घोंगवतंय
पण मनात, माझ्याच अस्तित्वाचा लढा सुरू आहे
का असती ज्वाला या देहाची जी मला जाळत आहे
कुठेतरी हा वणवा पेटला पण मनच माझं हरवलंय
कळे ना मला काही जात पात धर्म हा द्वेषाचा
माणसात ना दिसला मज प्रेमभाव हा समानतेचा
निर्भिड अंधकार दाटले काहूर माजले मनात माझ्या
चारी दिशांनी शोधत फिरले पण मन माझं हरवलंय
