मन भरलं नाही...
मन भरलं नाही...
मन भरलं नाही...
पाहून कोकण मुंबई
मन अजून भरलं नाही,
इथे पुन्हा पुन्हा यायची
मज इच्छा रोजच होई...
ताड ,माड,आंबा फणस,
इथे माणूस गोडवा खास,
भरला मनात हा निसर्ग
ही अद्भूत हिरवाई...
बिच, खाडी नी हा सागर
भात माशांचा स्वादिष्ट आहार
खावून पिऊन रोज ही तृप्त
मन कधीच होणार नाही...
कोकण कोकणचं आहे
मुंबईत फिरायला लोकल,
रांगा सह्याद्रीच्या हिरव्या
झरे वाहती खळबळ...
मन नाचतं आनंदून
पाहून हिरवा कोकण
गर्दी माणसांची मुंबईत
इथे डोळ्याला झोप नाही...
गायकवाड आर.जी.दापकेकर.
9834298315
