मला ठार केले
मला ठार केले
विश्वास ठेवला ज्यांच्यावर मी
शेवटी त्यांनीच मला ठार केले
समोरून येण्याची नव्हती हिम्मत
मग पाठीमागुनी त्यांनी वार केले
इतके होते सराईत खेळाडु ते की
मला माझ्या खेळातुन हद्दपार केले
शस्त्र कुठे होती हाती कुणाच्या तिथे
त्यांनी शब्दांनीच मला थंडगार केले
गोड गोड बोलुन माझ्याशी कधी
त्यांनी माझ्याशी इतके करार केले
आणी शेवटी अंत्ययात्रेसाठी माझ्या
त्याच वेड्यांनी येऊन मला तयार केले
लावायला विटंबना माझ्या देहाची
त्यांनी त्याचेही तुकडे चार केले
बोलतोय मी कुणाविषयी विचारले कुणी जेव्हा
तेव्हा आपणहून मी माझ्या घराचे बंद दार केले
