Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

मला आवडतो पाऊस

मला आवडतो पाऊस

1 min
163


मला आवडतो पाऊस खूप 

तन नि मन चिंब भिजवणारा |

प्रियकराच्या आठवणीत त्याच्या

प्रेयसीला नकळत खिजवणारा | |१| |


पाऊस घामेजल्या अंगाचा दाह 

कमी करून शीतलता देणारा |

मृद्गंधाची फवारणी करत सर्वांना 

प्रसन्नतेने जिंकून घेणारा | |२| | 


पाऊस शेतकऱ्यांना सुखावह

शेतीसाठी वरदान ठरणारा |

तृषार्त चातकाची मनसोक्तपणे

तहान भागवून धरणं भरणारा | |३| |


मला आवडतो पाऊस धरतीला

गर्द हिरवा शालू प्रदान करणारा |

मोराला नृत्यासाठी प्रेरणादायक

मेघांना नभी थोपवून धरणारा | |४| |


मला आवडतो पाऊस अगदीच

सानथोरांनाही नादी लावणारा |

अवखळ बालपणीचा सखा बनून

सखीच्या पाठीमागे धावणारा | |५| |


कागदी नावा सोडायला पाऊस

यावा अंगणात तळी साचवणारा |

येरे येरे पावसा गाणी म्हणतांना 

लहानग्यांना हर्षाने नाचवणारा | |६| |


पाऊस सा-यांनाच आवडतो पण या कवितेतून व्यक्त केलेलं पाऊस प्रेम तुम्हाला आवडता का त्यासाठीच वाचा ही कविता!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract