मितवा... एक लग्नगाठ
मितवा... एक लग्नगाठ
असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या वर बांधल्या जातात
पण हे खरं आहे हे प्रकर्षाने जाणवलं जेव्हा तू माझ्या
आयुष्यात प्रवेश केला होतास...
तू आयुष्यात येणं हा निव्वळ योगायोग आहे असं मी मानत होते
म्हणूनच तुझ्याशी मनाविरुद्ध बांधले गेले होते...
पण हा योगायोग नसून देवाने घडवलेला प्रेमळ लग्न्योग आहे...
याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा...
तुझं माझ्यात हरवून जाणं मला उमजलं...
संकटात हातात दिलेला तुझा हात माझ्या मनानं हेरला,
मला झालेला त्रास जेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसला तेव्हाच
मनाने कौल दिला तू ही रे माझा मितवा...