STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मिठी

मिठी

1 min
212

शाळेतून मी येताच

मिठी ती कडकडून

शिणलेली तनू माझी

जात असे सुखावून


किती किती गुजगोष्टी

तुझ्या प्रेमळ मिठीत

अरे किती वेळ झाला

सांगायची मी गोडीत


गेले ते रम्य दिवस

काळ पुढे सरकला

त्यासवेच आपल्यात

दुरावाही टपकला


आता तुझा दिन सुरु

दहा वाजताच रात्री 

कसातरी थांबतोस

फक्त थोड्या वेळासाठी


बोलावेसे वाटूनही

 शब्द अडती ओठांना

काळजात ह्या कुठारी

बांध घालिती बोलांना


जुजबीच बोलून तू 

कसा मागे फिरतोस

मिठी तुझी माझी राजा

कशी रे विसरतोस?


आत्ता बोललास तर

अर्थ आसेल शब्दांना

अर्थ नसेल मिठीला

नंतरच्या त्या प्रेमाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract