मिठी
मिठी
चाहूल होता तुझ्या येण्याची,
मन माझे अन आसमंत ही बहरे,
अन हळूच तू मिठीत घेता,
अंग माझे सरसरे||१||
बाहूत तुझ्या मला घेता,
मी स्वाधीन मजला करते
तुझ्या अलगद हाताचा स्पर्श होता,
वाटे अंगावर मोरपीस फिरते॥२॥
जोडी तुझी नी माझी,
मनात आपण जपणार
गोड मिठी ही आपली,
आता कधीच नाही सुटणार||३||

