मिटेल का हा दुरावा
मिटेल का हा दुरावा
नकळत गेला जिव्हाळा
नकळत गेली आपुलकी
नकळत सुटले हात
जे गुंफलेले प्रेमात
नकळत सुटले काळजी करणे
नकळत सुटले चौकशी करणे
जीवनाच्या या वाटेवर
सोबत असूनही सुटली सावली
सोबत चालले असतानाही
वाटे का ही वाट वेगळी
किती वाटे दूर तू गेला
इतका जवळ असतानाही
जीवन गाणे गाताना
संसाराचा गाडा ओढत आहे
न उरली त्यात माया
न उरले त्यात प्रेम
उरली फक्त जबाबदारी
अन् भीती समाजाची
पुन्हा नव्याने सूर्य उगवेल का?
अन् हा दुरावा मिटेल का?