STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

मिसाईल मॅन

मिसाईल मॅन

1 min
230

जगामध्ये झाले अनेक

 आयर्न मॅन, सुपरमॅन

भारतात एकच झाला मॅन 

नाव त्याचे मिसाईल मॅन

 देशासाठी त्यांनी

वाजपेयींना साथ दिली

 अमेरिकेसारख्या देशाला

 विज्ञानात मात दिली

पोखरणाला केली त्यांनी 

अणुस्पोटाची चाचणी

घातला जगाने बहिष्कार

नाही केली मनधरणी

कर्तृत्वामुळे त्यांच्या लागली

राष्ट्रपतिपदासाठी वर्णी

सर्व जगात केले नाव

 अशी त्यांची करणी

आदर्श घ्यावा अशी

साधी रहाणी

नाही लोभ पदाचा

नाही लोभ पैशाचा

अशी उच्च विचार सरणी

साऱ्या जगात आहेत

 त्यांचे फॅन

हिंदुस्तानात झाला

 एकच मॅन

मिसाईल मॅन मिसाईल मॅन

15 ऑक्टोबरला असतो

वाढदिवस त्यांचा

एपीजे अब्दुल कलाम

तुमच्या कर्तृत्वाला सलाम

अवघ्या देशाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational