STORYMIRROR

Rajendra Bhoiwar

Classics

2  

Rajendra Bhoiwar

Classics

मिळती सकळां गौळणी

मिळती सकळां गौळणी

1 min
14.1K


मिळती सकळां गौळणी ते बाळा ।

लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥

धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें ।

न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥

आदरें गृहा नेती मुख पैं धृताती ।

जेवूं पै घालिती दहींभात ॥३॥

एका जनार्दनीं प्रेमाची पैं लाठी ।

धांवुनी इठी मिठी घेतो बळें ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics